भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्ताचे चिंतनी मनाचें मननी

chittache chintani manachen manani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चित्ताचे चिंतनी मनाचें मननी । जीवाचे जीवनीं कृष्ण त्यांचे ॥१॥ बुध्दीचे बोधनीं श्रोत्राचे श्रवणीं । आमोद घेतां घ्राणी कृष्णीं मन ॥२॥ देहीं देहभावा नेणती स्वभावा । इंद्रियांचीया धांवा कृष्णरुपीं ॥३॥ निळा म्हणे त्यांचा वर्तता व्यापार । अवघा शार्ङगधर होऊनि ठेला ॥४॥