भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी

chaturya miravi | kala vyutpatti dakhavi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चातुर्य मिरवी । कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥ परी तें अवघें वांयां गेलें । एका न भजतां विठठलें ॥२॥ गायनाची कळा । आसनें मुद्रेचा सोहळा ॥३॥ निळा म्हणे जें जें करी । सोंगींचि तें तें अवघें वरी ॥४॥