भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें

je je houniyan anurakta | jhale virakta harinamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥१॥ त्यांचे अंगी विसांवला । ह्रदयींचि राहिला प्रगटोनी ॥२॥ नेदी उरों दुसरेपणें । त्यांचेनि प्राणें जीवें जितु ॥३॥ निळा म्हणे घालुनि मिठी । त्यांते कल्पकोटी न विसंबे ॥४॥