भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती

jenen majhi vachaspati | apulya krupen keli sarati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥१॥ त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥ अवघेंचि त्यांचे घेणें देणें । मी हें माझें कांहीचि नेणें ॥३॥ निळा म्हणे ठेविलों ऐसा । जाळींचा बुदबुद जळींचि जैसा ॥४॥