भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया

theval tethen rahen sukhen | yavari harikhen apuliya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥१॥ न वंची मी हे सेवेसी काया । धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥ दयाल ग्रास तो घालिन मुखीं । न करीं आणखी सोस कांही ॥३॥ निळा म्हणे कराल आज्ञा । न मोडीं प्राज्ञा तुमची ते ॥४॥