भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं

tumachya payin thevilen man | evadhenchi dhan majapashin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥ जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥ तरी हा प्राण ओंवाळीन । जीवें चरण न सोडीं ॥३॥ निळा म्हणे कृपा करा । यावरी धरा मजहातीं ॥४॥