भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पांती

tumhan amhan nitya bheti | nahin tuti kalpanti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुम्हां आम्हां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पांती ॥१॥ प्रभा केवि सांडी भानु । हुताशनु दीपनातें ॥२॥ मृतिकेतें सांडुनि घटु । कैचा पटु तंतुविण ॥३॥ निळा म्हणे आम्हावीण । नाहींच देवपण तुम्हांसी ॥४॥