भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम

tumachya balen ni:shank manin | gaun vadanin harinam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥ नुपेक्षी त्या पंढरिनाथा । जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥ निळा म्हणे भूमंडळीं । संत महाबळी विदीत ॥४॥