भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं

tumhi didhalen vaikunthabhuvan | sheshashayan majalagin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं ॥१॥ नाहीं तरी जाणता कोण । होतों निर्गुण निराभास ॥२॥ नामरुप कैचें मज । तुम्ही चित्तें सहज वाढविलें ॥३॥ निळा म्हणे आपुल्या दासां । देतो ऐसा बडिवार ॥४॥