भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें

tumachya payin jadatan man | nahin prayojan shabdanchen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥ तरी हे कां जी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥ दिवस रात्रीं न पुरे लिहितां । उठती चळथा अक्षरांच्या ॥३॥ निळा म्हणे लाविला धंदा । न कळे गोविंदा लीला तुमची ॥४॥