भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें

tumachya krupamrutajalin | majhi vachanavalli ankurali | mati vistaren phankali | phal sambharin harinamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें ॥१॥ नवल कृपामृतधन । वरुषला तुमचें हें वरदान । माझी वाचा आणि मन । केलीं पावन कीर्तनें ॥२॥ एकट एकलोचि श्रीपती । पुरोनि उरलेति त्रिजगतीं । अपूर्व चरित्रें अपूर्व ख्याती । संत गर्जती स्वानंदें ॥३॥ शुक सनकादिक नारद । व्यास वाल्मीक आणि प्रल्हाद । साही शास्त्रें चारी वेद । पुराणें पवाडे वर्णिती ॥४॥ परि तुम्ही नकळा त्यांचिये मती । अपार म्हणोनियां गुणसंपत्ती । जेथिंचे तेथेंचि भक्त स्तविती । अपार म्हणती विस्तारला ॥५॥ सगुण गोकुळीं गौळियां घरीं । निर्गुण योगियां हदयमंदिरीं । ढिसाळ ब्रम्हांडाबाहेरी । महर्षी देव स्तविताती ॥६॥ शिव आपुलिये हदयभुवनीं । नित्य निमग्न तुमचे ध्यानी । भोळया भाविकां लागुनी । आवडी ऐसें रुप धरी ॥७॥ कामिनीभावें कांतातुर । मदनमूर्ति मनोहर । वैरसंबंधी कंसचाणेर । तयां तैसाचि ते ठायीं ॥८॥ गोवळांमाजी गाईपाठीं । वानरांमाजीं मेळवुनी थाटी । रावणनि:पातनीं परम हटीं । आतुबर्ळी कळिकाळा ॥९॥ नित्य नूतन तुमचे गुण । चरित्रें गाती वैष्णव जन । निळा झाला सुखसंपन्न । चरणीं मन ठेवितां ॥१०॥