म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे
mhanati ghetalya amhin dhanachiya kodi | kharchayala kavadi thar nase
म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥ रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
mhanati ghetalya amhin dhanachiya kodi | kharchayala kavadi thar nase
म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥ रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥
mhanati sakal dvij javen pratishthana | tethuni patra ana ten vandya karun
म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं ॥१॥ नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥२॥
mhanasi bibhishan shahana | pari to maha nurkha jana
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥ काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाहीं झाला ॥२॥
mhana shriram jayaram | bhavasindhu tarak nam
म्हणा श्रीराम जयराम । भवसिंधु तारक नाम ॥१॥ नाम पतितपावन । नाम जीवांचे साधन ॥२॥
mhane dinabandhu tumhi savadh vhaven | santanshin naman nam vachen japavem
म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम ॥१॥ नामाविण साधन नाहीं या कलियुगी । व्यर्थ श्रम होती पाहतां मत्तें ॥२॥
mhane ba atan karishil kayi | ekala ye thayin yeuniyan
म्हणे बा आतां करिशील कायी । एकाला ये ठायीं येऊनियां ॥१॥ वय हें केवढें बुद्धि हे केवढी । वांयां काढाकाढी तपाची कां ॥२॥
mhane vithoji shankaracha | pratyaksha avatar tujha sacha
म्हणे विठोजी शंकराचा । प्रत्यक्ष अवतार तुझा साचा । स्तुति केली असे वाचा । विस्मयाचा पूर मज ॥१॥
yadnya yag dan vrat udyapan | hen nenen mi sadhan kay karun
यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं ॥१॥ जप तप होम स्वधर्माचरण । नव्हे तीर्थाटण कांहीं मज ॥२॥
yadnyadik karma karuni brahman | dambh acharan davi lokan
यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां ॥१॥ लोकांसी दाविती मीच कर्मनिष्थ । अभिमान खोटा वागविती ॥२॥
yam sange dutan | tuhmin javen mrutyuloka | apulala lok jituka | tituka anava
यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥ तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥
yamachiya nagarin doghejan gele | shankhaten sphurilen krushna-nathen
यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें ॥१॥ ऐकोनियां नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥
yamune pabali dekhiyeli murti | talapati dipti tejo-may
यमुने पाबळी देखियेली मूर्ती । तळपती दीप्ति तेजो-मय ॥१॥ सांवळें सुंदर ओंकार वर्तुळ । मध्यें घननीळ पाचारितो ॥२॥
yashoda ghusalit | stan mage bhagavant
यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥ घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥
yashoda vyakul jahalise pranen | sukhi aso tanhen vanamaji
यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी ॥१॥ उठती तिडका स्तनीं माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळां ॥२॥
yashode gharakade chal mala jevun ghal ||dhu
यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥ साध्या गव्हांची पोळी लाटीं । मला पुरण पोळी करून दे मोठी । नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवूं घाल ॥१॥
yashode bhonvalya milalya gaulani | sangati garhani nanapari
यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्हाणी नानापरी ॥१॥ गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊं सये ॥२॥
ya vithobaparaten an daivat mhanati | te shabda nay-kavati kanin majhya
या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥ पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥
ya vaishnavachya mata | to nenaven deva daitan
या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥ तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
yatihin chokhamela | tyasi bhaktancha kalavala
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला म्हणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
yatre bolavito hari | kanho navaja pandhari
यात्रे बोलावितो हरी । कांहो नवजा पंढरी ॥१॥ विठोबा कृपेचा कोंवळा । बहु भक्तांचा कळवळा ॥२॥