भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं

mhanati sakal dvij javen pratishthana | tethuni patra ana ten vandya karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणती सकळ द्विज जावें प्रतिष्ठाना । तेथुनी पत्र आणा तें वंद्य करुं ॥१॥ नाहीं जाती कुळ वर्ण अधिकार । क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हों ॥२॥ नव्हों देवगण यक्ष ना किन्नर । ऋषि निशाचर तेही नव्हों ॥३॥ ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधें इष्ट स्वरुप माझें ॥४॥ नव्हों आप तेज वायू व्योम मही । महत्तत्व तेंही विराट नव्हों ॥५॥ नव्हें मी सगुण नव्हें मी निर्गुण । अनुभूतीं भजन होउनी नव्हें ॥६॥ निवृत्ति म्हणतसे ऐकें ज्ञानेश्वरा । माझी परंपरा ऐसी आहे ॥७॥