भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम

mhane dinabandhu tumhi savadh vhaven | santanshin naman nam vachen japavem

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावें । संतांशीं नमन नाम वाचें जपावेम ॥१॥ नामाविण साधन नाहीं या कलियुगी । व्यर्थ श्रम होती पाहतां मत्तें ॥२॥ मताभिमान करोनि तुम्ही जाल आड वाटां । अभिमानें ठकविले नारदादि श्रेष्ठा ॥३॥ आलिया जन्मास आतां न करी आळस । नामदेवालागीम सांगे जगन्निवास ॥४॥