भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें

yamachiya nagarin doghejan gele | shankhaten sphurilen krushna-nathen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें ॥१॥ ऐकोनियां नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥ जोडोनियाम हात आणी अधोक्षजा । करोनियां पूजा पुसतसे ॥३॥ संदीपनपुत्र आहे तुजपाशीं । आणींरे तयासी शीघ्र आंता ॥४॥ तुमचा मी किंकर निरोप हो द्यावा । रामा वासुदेवा पुसतसे ॥५॥ घेवोनियां पुत्र तेथोनी चालिले । नामा ह्मणे आले गुरुगृहीं ॥६॥