भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥ आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥ गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी ॥१॥ ऐसें कांहीं सांग जेणें फिटे पांग । नित्य पांडुरंग-भजन सोपें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडीं देवा ॥१॥ प्राण जावो परी नको करूं त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी माझें भावितां न फिटे हें ओझें । कर्मकण्ड दुजें आड येत ॥१॥ न तुटे हें कर्म न चले हा धर्म । सर्वत्र हें ब्रह्म न कळे तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले । नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले । कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले । कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे ॥१॥ संसार स्वप्र जाणूनियां शरण रिघे पंढरीरायारेरे ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

मी म्हणतां अहंता होईल पूर्णता । भजन सर्वथा न घडे येणें ॥१॥ आपुलें आपण विचारावें धन । हरि हाचि पूर्ण भजें कारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥ मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥ चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुक्ताई उदासी जाली असे फार । आत्मा हें शरीर रक्षूं नये ॥१॥ त्यागिले आहार अन्नपाणी सकळीं । निवृत्तिराज तळमळी मनामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुक्ताईनें चांगा घेतलासे पोटा । उठा आतां भेटा लहान थोर ॥१॥ भेटले ऋषीश्वरा वैष्णव सकळीं । बैसले ते पाळी समाधीच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुक्तिप्रद आहे एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कवणालागीम ॥१॥ राहेम राहेम तूं मना निवांत । ध्याई अखंडित नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥ उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव