भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी

mi tun hen kathan sangasi kabad | viththal yevadhen na sangasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी ॥१॥ ऐसें कांहीं सांग जेणें फिटे पांग । नित्य पांडुरंग-भजन सोपें ॥२॥ मी आणि तूं हें वचन हो खोटें । विठ्ठलीं विनटे दिननिशीं ॥३॥ नामा ह्मणे भाव ऐसा धरीं सकळ । तुष्टेल गोपाळ न विसंबितां ॥४॥