भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

मातेलागीं पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥ क्षिराब्धीपासोनी चंद्रमा कां जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले ॥१॥ तरी न वदें न वदें आन । आन कांहीं या विठोबावांचून ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥ झणीं पांडुरंगा उपेक्षिसी मातें । तरी हांसतील तूंतें संतजन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायबापें काय नसती आमुचीं । लेंकरें आमचीं त्याचे हातीं ॥१॥ माझें देईं माझ्या हातीं लवलाही । होईं उतराई केशीराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज ॥१॥ भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि । तयाची समाधि आपेगांवीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माया पुरातनु तूंचि वो जननी । नाम संजीवनी विठठल वो ॥१॥ तेंचि हें वोळलें पूर्ण प्रेम आम्हां । लोलंगित ब्रह्मा पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये ॥१॥ विठठल श्रीरंग डोळस प्रसन्न । नित्य अमृतघन वोळला सदा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥ नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायेसी रुसलें भावासी त्यागिलें । जाऊनि राहिलें काकापासीं ॥१॥ काकी मुख दावा काकी मुख दावा । काकी मुख दावा बाईयांनो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मारावया राजे ब्राह्मणाचे घरीं । रेणुकाजठरीं अव-तार ॥१॥ करूनियां पृथ्वी नि: क्षत्रिय बहुवेळं । दान ते सकळां विप्रां दिली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं ॥१॥ पण केला होता न धरीं शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती ॥१॥ अरुणोदयीं येती कालिंदीचे तीरीं । गाती त्या सुंदरी कृष्णजीला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥ चिंताज्वरें फार तापलें अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण ॥१॥ हरि बा हरि हरि मुकुंद मुरारी । माधव नरहरि केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥ पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव