भजनी मालिका
← भजनांकडे परत

मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले

man todavaya kar shastranche | kathin bahutanche ubharile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मान तोडावया कर शस्त्रांचे । कठिण बहुतांचे उभारिले ॥१॥ तरी न वदें न वदें आन । आन कांहीं या विठोबावांचून ॥२॥ विठोबा परतें दैवत आहे ह्मणाती । ऐसें श्रुती स्मृती जरी बोलती । तरी ते अपशब्द कानीं पडों न द्यावे । पाखांडी म्हणती जरी उगोंचि असावें ॥३॥ ब्रह्मदेवेसी जालिया भेटी । तोहि जरी वदेंल ऐसिया गोष्टी । या विठोबापरतें दैवत म्हणेल सृष्टीं । चळला पोटीं निभ्रांत जाणा ॥४॥ कोटी कोटी ब्रह्मांडे एक एक रोमीं । व्यापू-नियां व्योमीं वर्ततसे ॥५॥ तो हा माझा विठोबा सर्वांघटीं सम । न सांडावें वर्म ह्मणे नामा ॥६॥