भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना

mayecha ha phansa ahankar valasa | pari hlashikesha bhajatina

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥ नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥ होतील त्यां मुक्ती पुरतील त्यां आर्ती । चरण हे चिंतीं विठ्ठलाचे ॥३॥ नामा ह्मणे केशव सर्वांभूतीं देव । ऐसा धरीं भाव भजनशीळ ॥४॥