भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेलागीं पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा

matelagin puse pita majha kon | te mhane vachan aik bala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मातेलागीं पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥ क्षिराब्धीपासोनी चंद्रमा कां जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥ तरी कां आम्हां त्यानें टाकीलें निवडोन । संचित ते म्हणे पूर्वकर्म ॥३॥ जाऊं भेटूं त्याला बोलवूं कां मागें । नको बा तुज काय उणें असे ॥४॥ नामा म्हणे ऐसा दोघांचा संवाद । झाला मनीं खेद सुमतीसी ॥५॥