भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारावया राजे ब्राह्मणाचे घरीं । रेणुकाजठरीं अव-तार

maravaya raje brahmanache gharin | renukajatharin av-tar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मारावया राजे ब्राह्मणाचे घरीं । रेणुकाजठरीं अव-तार ॥१॥ करूनियां पृथ्वी नि: क्षत्रिय बहुवेळं । दान ते सकळां विप्रां दिली ॥२॥ खुंटविला चिरंजीव अद्यापि तो आहे । आत्म-रूपीं पाहे निजानंदीं ॥३॥ दाशरथी रामा झाला समागम । तेणें एक बाण दिल्हा ह्मणे नामा ॥४॥