भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां

milavuni saungade sangati tayasi | chala gorasasi deton tumhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥ गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ॥२॥ न पुरेची हात दूध शिंक्यावरी । करावें मुरारी कैसें येथें ॥३॥ पाटावरी रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहो-रीनें ॥४॥ बडवोनी टिरी नाचतसे पेंदा । भलीले गोविंदा युक्ती केली ॥५॥ उदलाले बेत्या कलूं नको नलबला । थांबालीलो गोळा लेनियाचा ॥६॥ कोणी पिती दूध कोणी खाती दहीं । आली लव-लाही गौळण ते ॥७॥ अहर्निशीं धराया पहातें मी तुज । जासी कैसा आज चोरटीया ॥८॥ मुख्रींहूनि पय टाकी तिच्या डोळां । नामा ह्मणे पळा सांगतसे ॥९॥