भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा

muktapan amhan nako devaraya | bheti maj payan pure bapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥ चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥ खाय भिल्लिणीचीं फळें आवडतीं । काय त्याचे चित्तीं दुजा भाव ॥३॥ भावापाशीं देव उभा सर्वकाळ । खेचरानें बळें दाखविला ॥४॥ नामा म्हणे मज सद्‌‍गुरुची सत्ता । आम्हासि मुक्तता नको बापा ॥५॥