भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे

mhanati ghetalya amhin dhanachiya kodi | kharchayala kavadi thar nase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥ रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥ काय गुणें देव रिझाला त्यावरी । नेसाया फटकुरीं जन्म गेला ॥३॥ पाहोन दरिद्र जालोंज कासाविस । केवळ परीस ते पांढरेच ॥४॥ लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी । केले देशोधडीं महान संत ॥५॥ सगळेंची काखेसी घेई ब्रह्मांड । नामाअ म्हणे पाखांड दिसतें मज ॥६॥