भजनी मालिका
← भजनांकडे परत

यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी

yashoda vyakul jahalise pranen | sukhi aso tanhen vanamaji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी ॥१॥ उठती तिडका स्तनीं माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळां ॥२॥ जीव तळमळी दाटे माझा प्राण । केव्हां मी पाहीन पाडसासी ॥३॥ गोकुळींचे जन निघाले सकळ । पाहाताती गोपाळ वनामध्यें ॥४॥ कालिंदीच्या तीरीं पडिले सकळ । पाहोनी कोल्हाळ करीताती ॥५॥ कपाळ पिटिती यशोदा रोहिणी । आताम चक्रपाणी कैंचा आम्हां ॥६॥ धांव धांव कृष्णा दावींरे वदना । पाजूं आतां पान्हा कोणालागीं ॥७॥ तुझिया कौतुकें कंठीं मी संसार । जळतें अंतर तुजसाठीं ॥८॥ कोणावरी आतां घालूं अलंकार । बुडालें हें घर माझें आतां ॥९॥ नामा म्हणे शोकें जाऊं पाहे प्राण । सकळाचें जीवन कृष्णनाथ ॥१०॥