भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥ तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ प्रतिपदीं देव निघाले बाहेर । केला नमस्कार समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥ गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥ पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज म्हणे आतां पंढारिनाथा । मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥ वेधली चित्तवृत्ति स्वरूपीं निमग्न । नाहीं देहभान मुक्ताईला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसें वाटे ॥१॥ हालतें गगन डोलती विमानें । गेलें देहभान अवघियांचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥ निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तीनें एकांत केला मुक्ताईशीं । गमन कोणे दिवशीं आरंभिलें ॥१॥ मुक्ताई म्हणे जावें यावें कोठें । अवघें निघोट स्वरूप स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥ सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निशीं प्राप्त होतां भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदानें ॥१॥ संधी पाहोनियां प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥ सारजेसी सांगे भीमातीरीं हरी । बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥ जड या जीवाचें हरविलें अज्ञान । नेले उतरुन भवसिंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निसुगा निदसुरा झणीं तूं बा होसी । नाम ह्रषिकेशी घालीं मुखीं ॥१॥ गोविंद हरे कृष्ण विष्णु हरे । अच्युत मुरारे जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥ रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधाराक विठोबाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा । हें तों मज देवा समजेना ॥१॥ करूं कैसा जप करूं कैसें ध्यान । नाहीं माझें मन स्थिर देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती ॥१॥ न मागें मी तैसा न मागें मी तैसा । न मागें मी तैसा कदा काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेत्र माझे रोडले आठवे माहेर । कैं भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥ चतुर्भुज विठ्ठलु कैं देखेने डोळां । भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव