भजनी मालिका
← भजनांकडे परत

निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला

nisangachi sang na lage anikacha | paramartha ha sacha gahan kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥ जड या जीवाचें हरविलें अज्ञान । नेले उतरुन भवसिंधु ॥२॥ ज्ञानियासि केली सिंधुसंजीवनी । जालें जनीं वनीं एक तारुं ॥३॥ नामा म्हणे सत्य बा माझ्याचें बोलणें । करी निंबलोण पदीं त्यांचें ॥४॥