भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तीनें एकांत केला मुक्ताईशीं । गमन कोणे दिवशीं आरंभिलें

nivruttinen ekant kela muktaishin | gaman kone divashin arambhilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तीनें एकांत केला मुक्ताईशीं । गमन कोणे दिवशीं आरंभिलें ॥१॥ मुक्ताई म्हणे जावें यावें कोठें । अवघें निघोट स्वरूप स्वामी ॥२॥ गर्जतां गगन कडाडली वीज । स्वरूपीं सहज मिळयेली ॥३॥ मावळला दीप ज्योत कोठें होती । सहजा सामावती निरंजनीं ॥४॥ नामा म्हणे हरि जाईल पाहतां । ऐसें माझे चित्ता कळों आलें ॥५॥