भजनी मालिका
← भजनांकडे परत

निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा

nishchay pahuni upajali daya | svami devaraya panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥ सारजेसी सांगे भीमातीरीं हरी । बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥ लाडकें लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविण कोण आहे ॥३॥ मजवरी त्याचें बहु असे ऋण । होईन उत्तीर्ण एवढयानें ॥४॥ नामा म्हणे हातीं बांधोनियां वह्या । बैसे लिहावया पांडुरंग ॥५॥