भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्र तान्हेले पाजीं पाणी । पंढरिचे मायबहिणी

netra tanhele pajin pani | pandhariche mayabahini

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेत्र तान्हेले पाजीं पाणी । पंढरिचे मायबहिणी ॥१॥ बाळ पालकीं करी सोर । माते आला निद्राभर ॥२॥ जागी न होसी गे माये । प्राण जातो करुं काये ॥३॥ नामा म्हणे चक्रपाणि । चरणीं घातली लोळणी ॥४॥