भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा ॥१॥ ते माझे सोइरे सुखारे सद्नुरु । भवसिंधुचा पारु उतरतो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥ भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं ॥१॥ काया वाचा मन रंगलें चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥ आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥ भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि ॥१॥ पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोंजन्मी वारी घडली तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीराया माझिया बापें । प्रसन्न केलें तुजप्रतापें ॥१॥ आम्हां दिलें तुझे हातीं । पाळीं म्हणे प्रेमभक्ती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा ॥१॥ कायावाचामन चरणीं ठेवावें । प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग ॥१॥ म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पतितपावना धांवसी निर्वाणीं । ब्रीद चक्रपाणि सत्य केलें ॥१॥ काय अपराध कोणाचे पाहिले । नाहीं तुवां त्यागिलें नष्टखळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पतीव्रता मोठी सुमती सुंदरी । वाचेनें उच्चारी गुणदोष ॥१॥ संचित क्रियमाण वाहोनियां सकळ । प्रारब्ध केवळ सारीतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पद तीर्थ दान हें सर्व कुवाडें । नाम एक वाड केशवाचें ॥१॥ मुमुक्षु साधकीं सदा नाम गावें । तेणेंचिया व्हावें अखंडित ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राम्हाण म्हणती जनीनें नेलें ॥१॥ अगे शिंपियाचे जनी । नेलें पदक दे आणुनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा ॥१॥ सर्वांभूती कृपा संतांची संगति । मग नाहीं पुन-रावृत्ति जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली ॥१॥ तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देईं तुझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया ॥१॥ करीति बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लव-करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव