भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं

pandharichen sukh jihin anubhavilen | bhaven anusarale vithathal- payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचें सुख जिहीं अनुभविलें । भावें अनुसरले विठठल- पायीं ॥१॥ काया वाचा मन रंगलें चरणीं । धरियेला मनीं पांडुरंग ॥२॥ नामाचेनि बळें उडविलीं साधनें । तोडीलीं बंधनें संसाराचीं ॥३॥ मुक्तिपद कोणी नेघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥४॥ योगियांचें घर रिघे काकुलती । आव्हेरीलें संतीं ह्मणोनियां ॥५॥ दोन्ही कर जोडूनि मोक्ष पाहे वास । ह्मणे होईन दास हरिदासाचा ॥६॥ तंव तुच्छ करोनि न पाहती दृष्टी । आपंगिलें शेवटीं ब्रह्मज्ञानें ॥७॥ अष्ट महा-सिद्धि ह्मणती कवण गति । यावें काकूलती कवणा आह्मी ॥८॥ मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं । आमची ते सोयी काय धरिती ॥९॥ ऐसे भक्तराज देवां वंद्य झाले । ते एक राज्य केलें पुंडलीकें ॥१०॥ हर्षें निर्भर नामा नाचे महाद्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णीतसे ॥११॥