भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावना धांवसी निर्वाणीं । ब्रीद चक्रपाणि सत्य केलें

patitapavana dhanvasi nirvanin | brid chakrapani satya kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पतितपावना धांवसी निर्वाणीं । ब्रीद चक्रपाणि सत्य केलें ॥१॥ काय अपराध कोणाचे पाहिले । नाहीं तुवां त्यागिलें नष्टखळां ॥२॥ अजामेळासाठीं आहार वर्जिले । बीज तें भाजिलें भवमूळ ॥३॥ नामा म्हणे नागवेंचि बरें । आतां उणें पुरें पाहूं नका ॥४॥