भजनी मालिका
← भजनांकडे परत

परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा

paradara paradhan paraninda parapidan | sandoniyan bhajan harichen kara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा ॥१॥ सर्वांभूती कृपा संतांची संगति । मग नाहीं पुन-रावृत्ति जन्ममरण ॥२॥ शास्त्रांचें हें सार वेदांचें गव्हार । तें नाम परिकर विठोबाचें ॥३॥ नामा ह्मणे नलगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥४॥