भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतीव्रता मोठी सुमती सुंदरी । वाचेनें उच्चारी गुणदोष

pativrata mothi sumati sundari | vachenen uchchari gunadosh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पतीव्रता मोठी सुमती सुंदरी । वाचेनें उच्चारी गुणदोष ॥१॥ संचित क्रियमाण वाहोनियां सकळ । प्रारब्ध केवळ सारीतसे ॥२॥ गातें हरिनाम अखंड अंतरीं । प्राणेश्वरावरी भाव निका ॥३॥ बाळकाची कळा ठाउकी तियेसी । जीवें प्राण पोसी निरंतरा ॥४॥ नामा म्हणे काळ कल्याणाचा तिला । म्हणोनी जाहला हरिभक्त ॥५॥