भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा

pandharichen prem ahe tyanche jivin | tyanchi nitya navi karin asha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा ॥१॥ ते माझे सोइरे सुखारे सद्नुरु । भवसिंधुचा पारु उतरतो ॥२॥ माझ्या विठोबाच्या नामीं ज्यां विश्वास । होइन त्यांचा दास आवडीचा ॥३॥ माझ्या विठोबाच्या चरणीं ज्यांचा भाव । दारवंटा पाय धरीन त्यांचे ॥४॥ माझ्या विठोबाचें ध्यान ज्यांचें मनीं । सांडोबा अंगणीं होईन त्यांचे ॥५॥ ऐसे सर्वभावें माझ्या विठोबा शरण । त्यांचे वंदीन चरण नामा म्हणे ॥६॥