भजनी मालिका
← भजनांकडे परत

निसुगा निदसुरा झणीं तूं बा होसी । नाम ह्रषिकेशी घालीं मुखीं

nisuga nidasura jhanin tun ba hosi | nam hrashikeshi ghalin mukhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निसुगा निदसुरा झणीं तूं बा होसी । नाम ह्रषिकेशी घालीं मुखीं ॥१॥ गोविंद हरे कृष्ण विष्णु हरे । अच्युत मुरारे जनार्दन ॥२॥ करितां नामपाठ चुकती भवचाळ । तुटेल तें जाळें मायामोह ॥३॥ नामा म्हणे ऐसा उपाव सुगम । दिननिशीं नेम राम म्हणे ॥४॥