भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

तुझें तुझ्या ठायीं । तुजचि शुद्धि नाहीं । मी मी म्हणती काई । न कळे तुज ॥१॥ मीपण ठेवितां ठायीं । तुंचि ब्रह्मा पाहीं । इतर साधन कांहीं । नलगे येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझें श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर । कासें पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली । करुणाघना ॥१॥ मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानीं । विव्हळ जालें अंतःकरणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥ महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं ॥१॥ गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥ तेणें उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्‍याशींची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ