भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु

tutati bandhanen santanchya darushanen | kelen ten pavan jagin bahu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केलें तें पावन जगीं बहु ॥१॥ महा पापराशी तारिलें अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥ वाल्मिकादि दोषी तारिलें अनुग्रही । पाप तेथें नाहीं संत जेथें ॥३॥ पापताप दैन्य गेलें देशांतरीं । एका जनार्दनीं निर्धारी सत्य सत्य ॥४॥