भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळें पुरुषोत्तमा

tumachya sevecha mahima | maj na kalen purushottama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमच्या सेवेचा महिमा । मज न कळें पुरुषोत्तमा ॥१॥ पुजा करणे कवणें रीती । नेणें जपमाळ हातीं ॥२॥ स्नानसंध्या न कळे कांहीं । मन असो तुझें पायीं ॥३॥ तुम्हां मागणें इतुकें । एका जनार्दनीं द्यावें कौतुकें ॥४॥