ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं
jyasi karanen chittashuddhi | karmen acharavin adhin
ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
jyasi karanen chittashuddhi | karmen acharavin adhin
ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥ तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥
jyasi daha shiren mathan | vis hatin yetan | neduni sarvatha | jiven mari
ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी ॥१॥ गांठी घ्यावया नाहीं । आतां करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥
jyasi nahin santasang | te abhang duhkh bhogiti
ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥ तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥
jyasi pratidnya nirdharin | deva hari aniyelen
ज्यासी प्रतिज्ञा निर्धारीं । देवा हारी आणियेलें ॥१॥ तो हा शांतनूचा रावो । भीष्म देवो संग्रामीं ॥२॥
jhala namapath jhala namapath | mokshamarga vat sopi jhali
झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥ आवडी आदरें नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥
jhaliya gurukrupa sugam | sarvatra thaven parabrahma
झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥ तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥
jhali sandhya sandeh majha gela | atmaram hrudayin shejen ala ||dhru
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥ गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
takuniyan ninda stutiche vachan | taya narayan javalin ahe
टाकूनियां निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥ न लगे उपवास पारणें कारणें । सुखे नारायण घरा येती ॥२॥
talamrudang mohari | naubad vaje nanapari
टाळमृदंग मोहरी । नौबद वाजे नानापरी ॥१॥ घण घणाणा घंटा वाजे । घण घणाना घंटा वाजे ॥२॥
thayin theviliya man | sahaj hoil urtin
ठायीं ठेविलिया मन । सहज होईल उर्तीण ॥१॥ आलों ज्या कारणा । तेंचि करवा पंढरीराणा ॥२॥
thevanen anant janmanche | sampadalen aji sanchen
ठेवणें अनंत जन्मांचे । सांपडलें आजी सांचें ॥१॥ पुंडलिके तें पोखलें । जगा उपकार केलें ॥२॥
thevuniyan hat gela naradamuni | mantra hradayabhuvanin prakashala
ठेवूनियां हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला ॥१॥ उच्चार करितां त्रिभुवन ठेंगणें । विसरला मनें सापत्न दु:ख ॥२॥
doi bodoni keli khodi | kaya vitambili bapudi
डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥१॥ ऐसें नोहे निर्मळपण । शुद्ध करी कां अंतःकरण ॥२॥
dola na dise nyahari | drushti jali pathimori
डोळा न दिसे न्याहारी । दृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥ अझुनी काइसा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥
dola phodoniyan kajal lyala | nam kapun shimaga khelala
डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥ वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥
doliyachi bhuk harapali | pahatan shriviththal mauli
डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥
doliyannen rup pahaven sachar | mukhanen uchchar ramanam
डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥
tantupat jevin ekatva disati | taisin bhagavadbhakti sarvambhutin
तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥ सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥
tayan thayin abhiman nure | kod antarichen pure
तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥
tayan thayin jatan shudhda hoy amrut | naraden hi mat sangitali
तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥ तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमान पंढरीं उतरलें ॥२॥