भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥ भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो न कळे वेदशास्त्र गे माये । तो गोकुळी चोरुनी लोणी खाये ॥१॥ ऐशी भाविकांची आवडी देखा । टाकुनी आला वैकुंठ सुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो निर्गुण निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदिगुरु ॥१॥ तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधुत दत्तात्रय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां । आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥ पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥ देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जो हा उद्धार प्रसवे ॐ कार । तें रुप सुंदर विटेवरी ॥१॥ ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुटलें । तें प्रगटलें पंढरीयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जोडोनियां धन नाशी वेश्या घरीं । अतिथी आलिया द्वारीं नाहीं म्हणे ॥१॥ वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथें श्वान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञातिकुळ सांडिलें आम्हीं वेंगीं । माय माहेर त्याजिलें तुजलागीं । अंग अर्पिलें अंगीचिये अंगीं । शेखीं रतलासे दासी कुब्जेलागीं ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे ॥१॥ संतापायीं आधीं जावें वो शरण । संसार बोळवण होय तणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥ राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं ॥१॥ शिवनाम तुम्हीं घ्या रे । शिवस्मरणीं तुम्हीं रहा रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग वोळखितां कळे रुप ॥१॥ नामांचे जें मुळ रुपांचें रुपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा । ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ