भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती

dnyan dhyan varma shabdik kavitva | he to na kale artha mudhaprati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥ राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥ एका जनार्दनीं राम कृष्ण मनीं । भजा आसनीं शयनीं सर्वकाळ ॥३॥