भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥ होय तयांचा अंकित । नेणें लहान थोर मात । आपुलें आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारीं पैं तिष्ठत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥ न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें करुं ध्यान तुमचें देवा ॥१॥ करुनाकर तुम्हीं पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेणे नाम धरिलें कंठीं । धावें त्यांच्या पाठीं पोटीं ॥१॥ नामें गातां जनीं वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें कष्टें न लभे ज्ञान । आधीं पाहिजे समाधान । योगयाग तपाचें नाहीं कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥ आणिक नको रे साधन । वायां शीण ब्रह्माज्ञान । आम्हीं मुखीं गाऊं रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥ वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें निरसोनियां द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझें ॥१॥ तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥ तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ