भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी

jen sukh santasajjanache payin | ten sukh nahin anike thayi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥ पाहोंजातां लोकीं तिहीं । ऐसें न देखें आणिकें ठायीं ॥३॥ नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥ क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥ एका जनार्दनीं जाली भेटीं । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥