भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जेथें भक्त वसे । तेथें देव नांदे अपैसें

jethen jethen bhakta vase | tethen dev nande apaisen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें जेथें भक्त वसे । तेथें देव नांदे अपैसें ॥१॥ हाचि पहा अनुभव । नका ठाव चळूं देऊं ॥२॥ बैसले ठायीं दृढ बैसा । वाचे सहसा विठ्ठल ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । धरितां देव हातीं लागे ॥४॥