भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु

jethen parapashyantichi mavalali bhash | to svayamprakash davi guru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥ तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥ उपाधी तुटली शांति हे भेटली । सर्व तेथें आटली तळमळ ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाचें तें प्रेम । दाविलें सप्रेम हृदयांत ॥४॥