भजनी मालिका
← भजनांकडे परत

जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं

jon vinatala shriharicharanin | tyasi bhavabandhanin shram nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जों विनटला श्रीहरिचरणीं । त्यासी भवबंधनीं श्रम नाहीं ॥१॥ देव उभा मागें पुढें । वारी सांकडें भवाचें ॥२॥ नामस्मरणीं रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥ त्याचे तुळणें दुजा नाहीं । एका पाही जनार्दनीं ॥४॥