भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं

dnyan vairagya kavadi khandin | shanti jivan tayamadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञान वैराग्य कावडी खांदीं । शांति जीवन तयामधीं ॥१॥ शिवनाम तुम्हीं घ्या रे । शिवस्मरणीं तुम्हीं रहा रे ॥२॥ हरिहर कावड घेतली खांदी । भोवती गर्जती संतमांदी ॥३॥ एका जनार्दनीं कावड बरी । भक्ति फरारा तयावरी ॥४॥